5
(5)

स्वयंपाकगृह म्हणजे व्यायामशाळा असते ज्यामुळे आपण व आपला देह तंदुरुस्त राहतो .देव घरापेक्षाही स्वयंपाकगृह महत्त्वाचे असते . शरीर पोटावर चालते या देहातल्या देवाला नैवेद्य स्वयंपाकगृह देते .हृदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो आणि त्याची सुरुवात स्वयंपाकगृहातून होते .असं हे स्वयंपाकगृह म्हणजे कोणत्याही स्रीच्या मनाचा हळवा कोपरा असतो .भलेही ती स्त्री कर्तृत्वान असो वा गृहिणी असो .स्वयंपाकगृह हा तिचा जिव्हाळ्याचा विषय असतो . लॉक डाउनच्या काळात सर्वांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करताना , त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना मन समाधानानं भरून आले .एरवी कामाच्या गडबडीत माझे स्वयंपाकघर मदतनीसांच्या हाती सोपवलं होतं .पण या काळात आपल्या प्रत्येक वस्तूवर हळूवार मायेचा हात फिरवून त्यांना भरभरून धन्यवाद द्यावे वाटले .Thank you Ghar!